राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! जुनी पेन्शन लवकरच होणार लागू ! सरकारच्या वेगवान हालचाली !

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे .या संदर्भात राज्य शासनाकडून सकारात्मक भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे .याबाबतची आत्ताची लेटेस्ट अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया .

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एका भाषणामध्ये स्पष्टीकरण देताना सांगितले होते की राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य आहे यासाठी चर्चात्मक बाबी विचारात घेऊन लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल !

राज्याचे मुख्यमंत्री जुनी पेन्शन बाबत सकारात्मक वक्तव्य

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाजूने सकारात्मक भूमिका मांडली आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे , राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन लागू करण्याकरिता शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आली आहे . तर दुसरीकडे राज्य कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन बाबतचा लढा अद्याप सुरूच आहे , कारण असे आश्वासन कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा मिळूनही कोणताही निर्णय झालेला नाही .

जुनी पेन्शन लागू केल्यास राज्य शासनाच्या तिजोरीत 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा बोजा येणार आहे .हा बोजा महाराष्ट्र राज्य सरकारला सहज झेपवणार आहे कारण पंजाब ,हिमाचल प्रदेश , छत्तीसगड सारखे राज्य जुनी पेन्शन लागू करू शकतात तर महाराष्ट्र राज्याला हे सहज शक्य होणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक / पदभरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन

Leave a Comment