Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

मागील कित्येक दिवसांपासून आपण बघत आहोत, शिवसेना पक्षाबाबत ठाकरे गटामध्ये व शिंदे गटांमध्ये वादावाद होत आहेत. आता हा वाद थेट निवडणूक आयोगाकडे जाऊन पोहोचलेला आहे.

Shivsena President : मागील काही महिन्यांपूर्वीच शिवसेना पक्षांमधील काही आमदार बंडखोरी करत भाजप पक्षामध्ये घुसले. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. त्यामध्ये आपल्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे गट पाहायला मिळाले.

असे गट निर्माण झाल्यानंतर नक्की पक्ष कोणाचा? यावरून वाद सुरू झाले. शिंदे गटाच्या माध्यमातून असे सांगितले जात आहे की आमची शिवसेना आहे, पण उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून मूळ शिवसेना ही आमचीच असा दावा केला जात आहे.

शिवसेना नक्की कोणाची? हा प्रश्न आता कोर्टामध्ये व निवडणूक आयोगामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. दोन्ही गटाच्या माध्यमातून पक्ष आमचाच आहे. असा दावा केला जात आहे. मात्र निवडणूक आयोग नक्की निर्णय काय देईल याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे.

उद्धव ठाकरे बाळासाहेब यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात याव्यात याशिवाय यथास्थिती ठेवण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. मात्र अजूनही याबाबत काही स्पष्ट झालेले नाही.

काही दिवसातच शिवसेना पक्ष नक्की कोणाचा आहे आणि अध्यक्ष कोण असेल हे स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ लवकरच संपेल त्यामुळे आता अध्यक्ष कोण होईल याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे.

उद्धव ठाकरे समर्थक कार्यकर्ते असे म्हणत आहेत की शिवसेनेचे पुढील अध्यक्ष हे उद्धव ठाकरे असले पाहिजेत. या पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी व नेत्यांसाठी उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा अध्यक्ष असेल. कार्यकर्त्यांना याबाबतचे कोणतीही परवानगी देण्याची गरज नाही. अशी घोषणा ठाकरे गटाचे युवा नेते अनिल परब यांनी सांगितले. यामध्ये ते असे म्हणाले की, आम्ही स्वतः निवडणूक आयोगाकडे कायदेशीर औपचारिकता पाळण्याकरिता परवानगी मागितली होती.

यानंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या गटांनी थेट निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद पूर्ण केल्यानंतर दोघांनीही आमचीच खरी शिवसेना आहे असा आग्रह केला. सुनावणीनंतर आयोगाच्या माध्यमातून असे सांगण्यात आले की, जर काही निवेदन असेल तर दोन्ही पक्षांनी पुढील काही दिवसांमध्ये लेखी स्वरूपात सादर करावे.

शिवसेनेच्या घटनेत प्रमुख नेत्याची तरतूद नाही!

यामध्ये परब असे म्हणाले की, आमच्या वकिलाने अशाप्रकारे युक्तिवाद केला आहे की आमच्या पक्षात फक्त आमदारांचा यासोबतच खासदारांचा समावेश करण्यात आलेला नाही तर राष्ट्रीय कार्यकारी यासोबतच पक्ष संघटना यांचा देखील समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आमचे बहुमत आहे.

यासोबतच ते असे म्हणाले की, 2018 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वेळी बैठक घेतल्यानंतर उद्धव ठाकरे सोबत कोणी सुद्धा नव्हते त्यांच्या फेर निवडणुकीवर कोणताही प्रश्न उपस्थित होईल. मग आता अचानक शिंदे गट असा प्रश्न उपस्थित का करत आहेत.

शिवसेनेच्या घटनेमध्ये प्रमुख नेते पदाची तरतूद अजिबात केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःला मुख्यमंत्री पदावर निवडून घेणे अवैद्य असल्याचा दावा त्यांनी केला.

Leave a Comment