नमस्कार मित्रांनो आज आम्ही खास रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. जसे की मागे आपल्याला दिवाळीमध्ये रेशन दुकानाच्या माध्यमातून शिधा भेटलेला होता त्याचप्रमाणे आता गुढीपाडव्यामध्ये यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुद्धा रेशन दुकानावर शिधा आणखी एकदा भेटणार आहे.
शासनाने दिलेल्या ह्या वस्तूंना आनंदाचा शिधा असे संबोधले जात आहे. हा आनंदाचा शिधा जवळपास एक कोटी 63 लाख रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येणार असून दिवाळीमध्ये हाच शिधा वाटप केलेला होता.
आनंदाच्या शिधा मध्ये रेशन कार्ड धारकांना म्हणजेच एक कोटी 63 लाख रेशन कार्डधारकांना शंभर रुपये मध्ये हा शिधा उपलब्ध होईल. पूर्वी म्हणजेच 2022 मध्ये हा शिधा वाटप केलेला होता त्यामध्ये नागरिकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक लिटर पाम तेल, एक किलो चणाडाळ या वस्तू देण्यात आलेल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये आनंदाच्या शिधाबाबत एक महत्त्वाचा निर्णय निर्गमित करण्यात आला.
औरंगाबाद विभागामधील यासोबतच अमरावती विभागामधील आणि नागपूर विभागामधील यासोबतच 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जे कोणी नागरिक दारिद्र्यरेषेवरील असतील केशरी शिधापत्रिकाधारक असतील त्यांना एक किलो रवा देण्यात येईल, यासोबतच एक किलो साखर, एक किलो चणाडाळ व एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अगदी शंभर रुपयांमध्ये या सर्व गोष्टी शिधापत्रिकाधारकांना भेटणार आहेत.
जो काही आनंदाचा शिधा असेल तो ई-पॉसची व्यवस्था ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने देण्यात येईल. नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी आवश्यक शिधा हा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता सर्वात प्रथम महाडिएंटर्स या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून अगदी पंधरा दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाने मान्यता दिलेली आहे.
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
- आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !
- शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !
- या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !
- संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !