मोठी खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्ता वाढ झाली फिक्स ! राज्य शासनाचा मोठा निर्णय !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषदा , शिक्षक / शिक्षकेत्तर व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 4 टक्के वाढ फिक्स झालेली आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आलेली आहे . परंतु माहे जानेवारी 2023 ची डी.ए वाढ अद्याप पर्यंत लागु करण्यात आलेली नाही .

केंद्र सरकारच्या केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर झाल्यानंतर , केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण चार टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे . सदर वाढीव महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येणार असून ,माहे मार्च महिन्यांच्य वेतनासोबत प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य शासनाकडून देखिल कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ निश्चित करण्यात येत आहे . केंद्राप्रमाणे राज्यातील कार्यरत व सेवानिवृत्त  पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के डी.ए वाढ फिक्स करण्यात आलेली आहे . याबाबतचा अधिकृत्त जी.आर मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित करण्यात येईल , वित्त विभागाकडून याबाबत अधिकृत्त प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती मिडीया रिपोर्टनुसार समोर आलेली आहे .

चार टक्के महागाई भत्ता वाढीमुळे केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून एकुण 42 टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / सरकारी योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment