माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट ! शासन निर्णय निर्गमित GR दि.27.02.2023

Spread the love

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन बाबीकरीता सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे फेब्रुवारी 2023 या महिन्याकरीता निधी वितरीत करणेबाबत अल्पसंख्याक विकास विभागाकडून दि.27 फेब्रुवारी 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

वित्त विभागाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग ,मुंबई या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाकरीता आता पर्यंत अर्थसंकल्पित निधीच्या 70 टक्के च्या मर्यादेत म्हणजेच रुपये 58,74,400/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे . वित्त विभागाने आयोगाच्या वेतन या बाबीकरीता एकूण अर्थसंकल्पीय निधीच्या 90 टक्के 75,52,800/- एवढा निधी बिम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिला आहे .

त्यापैकी 58,74,400/- वजा जाता रुपये 16,78,400/- एवढा शिल्लक निधी आहे . आयोगाने कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी 2023 वेतन या बाबीकरीता रुपये 5,12,198/- एवढा निधी वितरीत करावी अशी विनंती करण्यात आलेली होती . त्यानुसार बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या निधी मधून रुपये 5,12,198/- एवढा निधी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .

या संदर्भातील अल्पसंख्याक विकास विभागाकडून दि.27.02.2023 रोजी निर्गमित झालेा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment