राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आली आत्ताची मोठी बातमी ! राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित GR दि.27.02.2023

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आत्ताची मोठी बातमी समोर आलेली असून , सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत ग्राम विकास विभागाकडून दि.27.02.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता दि.01.04.2023 ते दि.30.04.2023 पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि.01.05.2023 ते दि.31.05.2023 या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी .असा निर्णय यापुर्वी ग्राम विकास विभागांकडून घेण्यात आलेला होता . परंतु आता यामध्ये सदर निर्णयान्वये बदल करण्यात आलेला आहे .

वरील निर्णया ऐवजी विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता दि.01.04.2023 ते दि.15.04.2023 पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दि.16.04.2023 ते दि.30.04.2023 सर कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील ग्राम विकास विभागांकडून दि.27 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती /शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

Leave a Comment