8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन आयोग लागु करण्याच्या हालचालीस सुरुवात ! पगारात होणार दुप्पट वाढ !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच आठवा वेतन आयोग लागु करण्याच्या हालचालीस सुरुवात झालेली आहे .यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये चक्क दुप्पट वाढ होणार आहे .केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून आठवा वेतन लागु करणेबाबत प्राथमिक अहवाल गोळा करण्यास सुरुवात झालेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागु होणार हे निश्चित होत आहेत .

मिडीया रिपोर्टनुसार , सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे वेतन मिळत आहे . यामध्ये महागाई व बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार वाढ होणार आहे .फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास , किमान मुळ वेतनात वाढ होते . 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे विचार केला असता ,केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन 18,000/- वरुन 26,000/- होईल .त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , राज्य कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन 21,100/- होईल .

नविन वेतन आयोग हे दर आठ -दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येते , यानुसार सन 2016 मध्ये कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करण्यात आलेला होता .यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2024-26 या कालावधीमध्ये नवा वेतन आयोग लागु करणे आवश्यक आहे . यामुळे वेतन आयोगाची तयारी म्हणून केंद्र सरकारकडून लवकरच समिती गठीत करण्यात येईल .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबरोबर , निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये देखिल वाढ करण्याची तरतुद नवा वेतन आयोगामध्ये आहे .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच सुधारित वेतनश्रेणीप्रमाणे पगार मिळणार आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment