सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून मिळवा बिनव्याजी दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज ! योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी अर्ज सादर करावा;

Spread the love

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक आनंदाची व महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. केंद्र सरकारने खास उद्योजकांसाठी एक महत्वकांक्षी योजना राबवली आहे. जर तुम्हाला स्वतःचे नवीन स्टार्टअप उभा करायचा असेल स्वतःचा नवीन व्यवसाय उभा करायचा असतो तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे…

या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय उभा करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय किंवा तारण न ठेवता दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज अगदी सहजपणे मिळू शकते. मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल या योजनेचे नाव आहे मुद्रा लोन योजना.

तरुण वर्गाने या सोबतच बेरोजगार युवकांनी आता थेट व्यवसाय मध्ये उतरून स्वतःच्या हिमतीवर उभे राहावे. सोबतच अशा युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनाने ही पाऊल उचलली आहे.

विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला नॉन कॉर्पोरेट यासोबतच बिगर कृषिधारकांना देखील कर्ज उपलब्ध होत आहे.

मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज उपलब्ध करून घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही शासकीय बँकेमधून किंवा खाजगी बँकेमध्ये सोबतच प्रादेशिक ग्रामीण बँका असतील याशिवाय लघु वित्त बँका गैरविस्तर बँका या ठिकाणी अर्ज करू शकता.

मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने लिमिट बनवलेली आहेत. यामध्ये मुख्य तीन लिमिट आहे. प्रथम लिमिट शिशु लोन यामध्ये मधून 50 हजार रुपये पर्यंत आपल्याला आर्थिक मदत म्हणून कर्ज उपलब्ध होते. दुसरी लिमिट किशोर लोन या माध्यमातून आपल्याला पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होते आणि तिसरी लिमिट आहे तरुण लोन या माध्यमातून आपल्याला दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होत आहे.

Leave a Comment