अखेर राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश ! वाढीव वेतनासह इतर लाभ देण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय !

Spread the love

राज्य शासनाच्या बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबितच होत्या . प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याकरीता अंगणवाडी सेविका / मदननिस कर्मचारी वारंवार शासन दरबारी आलल्या गऱ्हाणे मांडत असतात , परंतु त्यांच्या कोणत्याच मागण्या पुर्ण होत नाहीत .परंतु राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या वेतनाच नव्हे तर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ देखिल अनुज्ञेय करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे .

अंगणवाडी सेविका / मदतनिस हे कर्मचारी राज्य शासनाचे अतिरिक्त कर्मचारी असून त्यांना वेतनाऐवजी मानधन दिले जाते . परंतु अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी अशी होती कि , कामाचा मोबदला म्हणून मानधन न देता इतर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे .अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा विचार करता , राज्य शासनाने वेतनांमध्ये 1500/- वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे .

वाढीव पगाराबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल टॅब व राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शनही सुरु करु असे आश्वासन राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत .यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराबरोबर इतरही मोठे लाभ मिळाले आहेत .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment