राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी ! या सुचनांचे पालन करणे बंधनकारक अन्यथा गंभीर परिणामास जावे लागणार सामोरे !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनाचे मुख्य सचिवांनी पत्र काढून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महत्वपुर्ण सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर सूचनांचे पालन करणे कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असणार आहेत .कर्मचाऱ्यांने सदर सूचनांचे पालन न केल्यास कर्मचाऱ्यांना गंभीर परिणामास सामोरे जावे लागणार आहे . या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .

सदर सूचनांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , काही सरकारी कर्मचारी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सरकारी धोरणे / शासकीय बाबी / उपलब्ध इत्यादींवर उघडपणे टीका / टिप्पणी करत असल्याचे आढळून आले आहेत .यामुळे आता मुख्य सचिवांनी सर्व प्रशासकीय सचिवांना सोशल मिडीया नेटवर्कवर नियमितपणे देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सोशल मिडीयावर सरकारी धोरणे / उपलब्ध इत्यादींवर प्रतिकूल टिका / टिप्पणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवून सदर कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आलेले आहेत .तसेच या संदर्भात सविस्तर परिपत्रक जारी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला राज्य मुख्य सचिवांकडून देण्यात आलेले आहेत .

सदरचे धोरण प्रशासनाच्या हेतुने योग्य असले तरी अयोग्य व चुकीच्या धोरणांचा विरोध करणे देखिल कर्मचाऱ्यांचा अधिकारी आहे . कारण कर्मचारी हा देखिल देशाचा / राज्याचा नागरिक आहे . त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे .परंतु सरकारी कर्मचारी म्हणून काही बंधनांचे पालन देखिल कर्मचाऱ्यांनी करणे आवश्यक आहे .

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment