राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन / भत्ते व अतिरिक्त कार्यभार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.03.2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन शाळा / शाखा / तुकड्यांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.01 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित / अंशत : अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील एकाच संस्थेच्या दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये / एकाच शाळेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये / एकाच शाळेच्या अनुदानित तसेच अंशत : अनुदानित तुकडीवर अशा दोन ठिकाणी अर्धवेळ शिक्षक पदाचा कार्यभार पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमधून अदा करताना शासनाने घोषित केलेल्या अनुदानानुसार अनुज्ञेय टक्केवारीनुसार एकाच शाळेतुन काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

अर्धवेळ मान्य पदावर कार्यरत असलेल्य उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना दुसऱ्या अर्धवेळ पदाचा कार्यभार मंजुर करताना शासन निर्णय दि.04.07.2007 मधील घालून दिलेल्या अटी / शर्तींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत .तसेच शिक्षण उपसंचालक यांनी दोन अर्धवेळ पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबतची अनुज्ञेयता तपासण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

जे पद प्रथम निर्माण झाले ते पद पुर्णवेळ करुन संच मान्यतेत आवश्यक ती दुरुस्ती करुन सदर दोन्ही अर्धवेळ पदांचे वेतन व भत्ते अपवादात्मक परिस्थित विशेष बाब म्हणून एकाच लेखाशीर्षातून काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील शालेय शिक्षण विभागांकडून दि.01 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment