कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश !  या राज्य कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ व नविन वेतन आयोगही लागु !

Spread the love

कर्नाटक राज्यातील कर्मचारी पगार वाढ व सातवा वेतन आयोग लागु होण्याच्या प्रमुख मागणींकरीता आदोलन केले होते . या आंदोलनाला यश मिळाले असून कर्नाटक राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात चक्क 17 टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे .कर्नाटक राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूका असल्याने , कर्नाटक राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गिफ्ट दिलेले आहेत .

कर्नाटक राज्यातील कर्मचारी – राज्यांमध्ये सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी , जुनी पेन्शन योजना पुन्हा अंमलबजावणी करण्यात यावी तसेच किमान 40 टक्के इतर सुविधांची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणींकरीता आंदोलन करण्यात आलेले होते .

या वरील मागणीपैकी कर्नाटक राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे , यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 17 टक्के वाढ झालेली आहे .सदरचा निर्णय घेण्याकरीता बोम्मई राज्य सरकाने अतिरिक्त मुख्य सविचांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना करण्यात आलेली होती . सदर समितीने अहवाल सादर केला अहवालास कर्नाटक राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे .

त्याचबरोबर कर्नाटक राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्याकरीता समितीची स्थापना करुन योग्य निर्णय घेण्याकरीता मंत्रीमंडळाची आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे .पगारवाढीमुळे कर्नाटक राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ झालेली आहे .

कर्मचारी विषयक / शासकीय पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment