राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.03.2023

Spread the love

राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील अतिरिक्त संवर्ग कक्षातून सह जिल्हा निबंधक वर्ग 2 / सह दुय्यक निबंधक वर्ग 2 या संवर्गात समावेशनाने नियुक्त अधिकाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मंजुर करणेबाबत महसूल व वन विभागांकडून दि.02 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

वित्त विभागाच्या दि.01 एप्रिल 2010 च्या शासन निर्णयान्वये नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागातील अधिकाऱ्यांना 12 व 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतर पहिला , दुसरा लाभ अनुज्ञेय करण्याची तरतुद आहे . सदर तरतुदीनुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील समावेशनाने नियुक्त अधिकाऱ्यांना गट ब वेतनश्रेणी 9300-34800 ग्रेड पे 4400/- या पदावर सलग 12 वर्षाची नियमित सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ त्यांच्या संरक्षित केलेल्या वेतनश्रेणी रुपये 156,600-39,100/- ग्रेड पे 5400/- या वेतनश्रेणीतच एक वेतनवाढ देवून दुसरा लाभ मंजुर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

सदर दुसरा लाभ व वेतनवाढ मंजुर करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत . सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे संबंधति अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत आणि कर्तव्यामध्ये , वाढ होत नसली तरी वित्त विभाग शासन निर्णय दि.01.04.2010 मधील तरतुदीच्या अधिन राहुन वेतन संरचनेत वेतन निश्चितीचा लाभ मिळणार आहे .

जलसंपदा विभागातील आदेशातील नमुद अधिकारी अतिरिक्त ठरल्यामुळे समावेशनाने नोंदणी व मुद्रांक विभागात रुजु झालेले आहेत . अशा अधिकाऱ्यांचे रुपये 15,600-39100/- ग्रेड पे 5400/- या वेतनश्रेणीत वेतन संरक्षित झाले असल्याने त्यांना पदोन्नतीच्या साखळीतील वरच्या पदाची वेतनश्रेणी 9300-34800/- ग्रेड पे 5000/- या वेतनश्रेणीत वेतन न देता महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियमांनुसार 15600-39100/- ग्रेड पे 5400/- या संरक्षित वेतनश्रेणीतच एक वेतनवाढ मिळवून वेतननिश्चिती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

या सदंर्भात महसूल व वन विभागांकडून दि.02 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन‍ निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक / पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment