अनेक नागरिक गुंतवणुकीवर जास्त परतावा देणाऱ्या यासोबतच गुंतवणूक केल्यानंतर कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बऱ्याच नागरिकांना विविध योजनांविषयी माहितीच नसते.
Post Office : प्रत्येक जण आपल्या भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी अगदी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करतात. सध्या नागरिक विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. तुम्ही देखील अशाच खात्रीशीर ठरणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे परतावा मिळू शकतात. इतकेच नव्हे तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून विविध सवलती देखील मिळत आहेत आणि विशेष म्हणजे कोणतीही योजना जोखीमीच्या आधी नाही अशा प्रकारची योजना आज आपण पाहणार आहोत.
जर तुम्ही पुढील दिलेल्या माहितीप्रमाणे या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळेलच यासोबतच आयकर कायद्याच्या कलम 80 सी च्या माध्यमातून तुमचा कर सुद्धा वाचू शकेल. मित्रांनो पोस्ट ऑफिस च्या सर्वच योजना या शासकीय योजना असून त्यामध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
शासनाने राबवलेली सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक महत्त्वकांक्षी दीर्घकालीन बचत योजना असून कलम 80 सी च्या माध्यमातून 7.1% चक्रवाढ असा व्याजदर यासोबतच कर यावर सूट भेटते. मित्रांनो ह्या योजनेचा लाभ घेण्याकरिता एखाद्या व्यक्तीला कमीत कमी पंधरा वर्षे तरी गुंतवणूक करावी लागेल. या माध्यमातून तुम्ही तब्बल दीड लाख रुपये पर्यंत चक्कर वाचवू शकणार आहे.
सुकन्या समृद्धी योजना
मित्रांनो पोस्ट ऑफिस ने राबवलेली सुकन्या समृद्धी योजना ही योजना विशेष म्हणजे दहा वर्षाखालील मुलींसाठी एक अतिशय उत्तम ठरणारी योजना आहे. जर या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर वयाच्या 18 व्या वर्षी ते काढता येतील. यासोबतच 21 वर्षानंतर तुम्हाला योजनेच्या माध्यमातून सर्वच रक्कम पूर्णपणे मिळेल या योजनेमध्ये गुंतवणुकीवर 7.6% व्याजदर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेमध्ये देखील तुम्हाला दीड लाख रुपये पर्यंत असा वार्षिक कर वाचवता येईल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
पोस्ट ऑफिस ने राबवलेली ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही वार्षिक आठ टक्के व्याजदर देत असून यामध्ये दीड लाख रुपये पर्यंतचा कर हा वाचवता येणार आहे. इतकेच नव्हे तर या योजनेच्या माध्यमातून आता गुंतवणुकीची मर्यादा ही तीस लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे…
टाइम डिपॉझिट स्कीम
पोस्ट ऑफिस ने राबवलेली ही एक महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेमध्ये पाच वर्षासाठी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या योजनेचे नाव आहे टाईम डिपॉझिट स्कीम योजना या योजनेमध्ये देखील दीड लाख रुपये पर्यंत च्या करावं सूट मिळत आहे. सात टक्के पर्यंत व्याजदर यासोबतच कर वाचून गुंतवणुकीचा हा एक चांगला पर्याय आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना
पोस्ट ऑफिस ने राबवलेली ही एक महत्त्वाची योजना असून नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेची जवळपास एक हजार रुपयांपासून सुरुवात करता येणार आहे. या योजनेमध्ये सात टक्के व्याजदर उपलब्ध करून देण्यात आला असून कलम ८० सी च्या माध्यमातून या योजनेमधून दीड लाख रुपये पर्यंत कर वाचवता येईल.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !