राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.21.03.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत लाभदायक शासन निर्णय ! GR दि.21.03.2023

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सन 2022-23 अर्थसंकल्पीय अनुदान , मागणी क्र. जे 5 ,7610 , शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे – मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे मंजुर करणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.21 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . कर्जे / अग्रिमे मंजुर करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे मंजुर करत असताना शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील सुधारीत अटी व शर्ती पुढीलप्रमाणे पाहुयात .

मोटार वाहन / कार खरेदी करणार असलेल्या वाहनांची किंमत ही प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास , शिल्लक रक्कम तात्काळा राज्य शासनाला परत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . तसेच शासन निर्णयांमध्ये जितक्या रक्कमेची अग्रिमे मंजुर झालेले आहेत , त्याच रक्कमेचे अग्रिमे मंजुर करुन द्यावे .शासन निर्णयांमध्ये नमुद ज्या कर्मचाऱ्यांच्या नावे अग्रिमे मंजुर झालेले आहेत , त्याच कर्मचाऱ्यांच्या नावे अग्रिमे मंजुर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

संबंधित कर्मचारी एखाद्या मंजुरी / नियंत्रक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातुन बदलून दुसरीकडे गेले असल्यास , अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर Authorisation Slip काढण्यापुर्वी त्याबाबतचा तपशिल शासनास कळविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .त्यानंतर त्या अनुषंगाने प्रणालीवर प्राधिकृत्त करण्यात आलेल्या रक्कमेमध्ये शासनाकडून आवश्यक ते बदल करण्यात आल्यानंतरच देयके तयार करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करा

शासन निर्णय

Leave a Comment