राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी मध्ये मोठी सुधारणा ! गुढीपाडव्याच्या अगोदरच मिळाली मोठी भेट ! Gr निर्गमित !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या अगोदरच मोठी भेट मिळालेली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी प्रमाणे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . या संदर्भात राज्य शासनाकडून सुधारित वेतनश्रेणी बाबतचा अधिकृत शासन राज्यपत्र निर्गमित झालेला आहे .

सुधारित वेतनश्रेणी दि.01 जानेवारी 2016 पासून वेतन फरकास लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून , यासंदर्भातील अधिकृत शासन राजपत्र दिनांक 3 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सात वर्षांची मिळणार वेतन फरक

सुधारित वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना 2016 पासूनच लागू करण्यात येणार असल्याने 2016 ते 2023 असे एकूण सात वर्षांची वेतन फरकाची रक्कम टप्प्यानुसार अदा करण्यात येणार आहे .

राज्य शासनाने नुकतेच बक्षी समिती खंड दोन अहवाल स्वीकारून राज्यातील विविध विभागातील 106 पदांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली होती . त्या अनुषंगाने काही कर्मचारी वंचित होते , अशा कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करणे राज्य शासनाच्या विचाराधीन होते , यानुसार आता सदर शासन राजपत्रामध्ये नमूद कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !

सुधारित वेतनश्रेणी शासन निर्णय

कर्मचारी विषयक भरती योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment