राज्य शासन सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / DCPS योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करणेसाठी निधींचे वितरण करण्याकरीता निधीचे वितरण करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.23 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे .
राज्यातील जिल्हा परिषदा खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयामधील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धतीनुसार सन 2022-23 मध्ये कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी विभागाने केलेली पुरवणी मागणी हिवाळी अधिवेशात मंजूर करण्यात आलेली होती .
यानुसार सदर निर्णयान्वये राज्य शासनाने तीनशे एकोणपन्नास कोटी सत्तेचाळीस लाख पाच हजार पाचशे रुपये फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय विवरण प्रणाली द्वारे आयुक्त यांच्या वितरणक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील शासनाने अंशदान अशा एकत्रित रकमेवरील व्याज निर्णयामध्ये नमुद लेखाशिर्षामध्ये प्रस्तूतनुसार मंजूर अनुदानातून BEAMS वर उपलब्ध करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.23 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती ,शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !