संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !

Spread the love

दिनांक 14 मार्च 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीमध्ये राज्य कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणी करिता , बेमुदत संपावर गेले होते . सदर संप कालावधीमधील वेतन कपात करू नये , शिल्लक रजेमधून सदरची रजा वजा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी, देखील काही कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांमध्ये सेवा खंड बाबतची नोंद करण्यात आलेली आहे .

यामध्ये नमूद करण्यात आले आहे की , दिनांक 14 मार्च 2023 ते दिनांक 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये सदर कर्मचारी संपावर असल्याने सदर कालावधीत त्यांना विनावेतन करण्यात आली असून , संपाच्या कालावधीमधील सेवा खंड कालावधी म्हणून म्हणून समजण्यात येईल . अशी नोंद करण्यात आलेली आहे .

राज्य शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजेमधून सदर सात दिवसाची रजा वजा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत , संप कालावधीमधील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये , असा आदेश असताना देखील प्रशासनाकडून सेवाखंड , वेतन कपात अशा प्रकारचे जाचक निर्णय घेतले जात आहेत .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा ||

Leave a Comment