शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !

Spread the love

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी लाडली लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 43 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल असा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून ज्या मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. ज्या मुलींच्या पालकांनी या योजनेच्या माध्यमातून अर्ज सादर केला आहे. त्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. त्यामुळे आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून अर्ज नक्की कसा व कोठे करावा याविषयी पुरेपूर माहिती पाहणार आहोत.

तुमची परिस्थिती खूपच गरीब आहे अशावेळी तुम्हाला मुली असतील तर त्या मुलींच्या शिक्षणासाठी नक्कीच तुम्हाला पैशांची गरज भासेल. या गोष्टीवरती विचार करून शासनाने लाडली लक्ष्मी योजना राबवली आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाची पुरेपूर जबाबदारी शासन घेते.

लाडली लक्ष्मी योजसाठी अर्ज कशाप्रकारे करावा?

या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वात प्रथम अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सरळ लाडली लक्ष्मी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्मवर क्लिक करून तुमची जी काही माहिती आहे म्हणजेच मुलीची माहिती आहे ती पुरेपूर माहिती भरून घ्यायची आहे.

त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दाखवले जातील. त्यामधून तुम्हाला सामान्य पर्याय निवडून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

असे केल्यानंतर पुढे आणखी तुम्हाला विविध माहिती विचारली जाईल. ती माहिती बिन चुकता व्यवस्थितपणे भरायचे आहे.

त्यानंतर पुढे पालकांची माहिती विचारली जाईल त्या ठिकाणी पालकांची माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे. यासोबतच मुली विषयी आणि तिच्या शिक्षणाविषयी पुरेपूर माहिती भरावी लागेल माहिती भरल्यानंतर सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करा.

लाडली लक्ष्मी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पुढील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज सादर करावा.

https://www.maharashtra.gov.in/1125/Home

Leave a Comment