Breaking News : संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रशासनाकडून धक्कादायक परिपत्रक निर्गमित ! दि.23.03.2023

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी संप करण्यात आले होते . हा संप दिनांक 20 मार्च 2023 रोजी पर्यंत सुरूच होता , सदर संप संपल्याची अधिकृत घोषणा कर्मचारी संघटनाकडून दि.21.03.2023 रोजी करण्यात आली होती . या संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक धक्कादायक परिपत्रक प्रशासनाकडून काढण्यात आली आहे .

जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सर्व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना सदर परिपत्रक सादर करण्यात आली आहे . या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे , की दिनांक 14 मार्च 2023 पासून विविध संघटनांनी पुकारलेला संपामध्ये सहभागी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या माहे जानेवारी 2023 चे वेतन अदा करताना संबंधित शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा संप कालावधीमधील वेतन वजावट करून मासिक वेतन अदा करण्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

या संप कालावधीमधील वेतनाबाबत शासन स्तरावरून आदेश सूचना निर्गमित झाल्यानंतर या संप कालावधीमधील वेतनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल , असे आदेश सदर परिपत्रकानुसार आदेश देण्यात आलेले आहेत .

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करू नये , असा आदेश प्रशासनाला दिला असताना देखील , प्रशासनाकडून वेतन कपातीचे परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहेत . या संदर्भातील दिनांक 23 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment