आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळालेली आहे . केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जानेवारी 2023 पासून 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आला आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .

या संदर्भात केंद्रीय कॅबिनेटने महत्वपुर्ण निर्णय घेतला असून , केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता फरकासह माहे मार्चच्या वेतनासोबत वाढीव डी.ए लागु करण्यात आलेला आहे .या निर्णयामुळे देशातील तब्बल 47.58 लाख कर्मचारी तसेच 69.76 लाख पेन्शनधाारक कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय होणार आहे .

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पासून 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता , आता यामध्ये जानेवारी 2023 पासून आणखीण 4 टक्के वाढ करण्यात आलेली आहे . यामुळे देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए वाढीमुळे वेतन / पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4% DA लागू , करणेबाबत कॅबिनेट बैठकीचे आयोजन !

केंद्रीय आकडेवारीनुसार वाढीव महागाई भत्तामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुमारे 12,815 कोटी रुपयांचा वार्षिक भार येणार असल्याची माहीती देण्यात आलेली आहे .सदरची डी.ए / डी.आर वाढ ही सातव्या वेतन आयोागाच्या शिफारशीनंतर करण्यात आलेली आहे .

DA वाढ निर्णय

कर्मचारी विषयक , पदभरती शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment