राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार

Spread the love

मराठीसंहिता , प्रणिता पवार प्रतिनिधी, मुंबई :  राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या बदली संदर्भात राज्य शासनांकडून नविन धोरण अंमलात आणण्याची शक्यता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी वर्तविली आहे .या नविन धोरणांनुसार राज्यातील शिक्षकांना बदलीपासून सुटका देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे .

यावेळी त्यांनी स्पष्ट केले कि , राज्यातील जिल्हा परिषदा शिक्षकांना बदलीमधून सुटका देण्याचे नवे धोरण राज्‍य सरकारकडून ठरविण्यात येत आहेत .जेणेकरुन शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देता येईल . शिवाय शिक्षकांना एकाच ठिकाणी सेवा बजावता येईल . याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे यावेळी बोलताना दिपक केसरकर यांनी सांगितले आहे .

राज्यांमध्ये सध्या खाजगी शाळांमध्ये बदली बाबत असेच धोरण असल्याने , खाजगील शाळांमधील शिक्षकांना एकाच ठिकाणी राहुन सेवा बजावता येते .नविन धोरणांनुसार विनंती बदली करता येईल असे शालेय शिक्षणमंत्री यांनी स्पष्ट केले .परंतु मागील तिन वर्षांपासून बदली प्रक्रिया रखडली असल्याने , अनेक कर्मचाऱ्यांना बदली पासून वंचित रहावे लागत आहेत .

या नविन धोरणांमुळे राज्यातील शिक्षकांची बदली बाबतची कायमची झंझट संपणार आहे , यामुळे शिक्षकांचे लक्ष आता या नविन धोरणांकडे लागले आहेत .

स्त्रोत –  zeenews.india.com/Marathi date : 24.04.2023

Leave a Comment