एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !

Spread the love

मराठी संहिता , प्रणिता पवार मुंबई : प्रशासन खास मुलींसाठी सातत्याने विविध योजना राबवत असून यापैकी एक महत्त्वाची योजना आहे तिचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना. या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक लाभ प्राप्त होत आहे. तर माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की काय आहे आणि या योजनेचे फायदे काय आहेत? या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल? या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज कसा करावा? फॉर्म कसा भरावा? याबद्दल आजच्या लेखाच्या माध्यमातून पूर्ण माहिती पाहणार आहोत.

मुलींच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी यासोबतच मुलींच्या शिक्षणाला चालला येण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक एप्रिल 2016 रोजी एक नवीन योजना राबविण्यात आली. ज्या योजनेचे नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. या योजनेच्या माध्यमातून मुलीचा जन्म झाल्यानंतर एका वर्षाच्या आत आणि ज्यावेळी दुसरी मुलगी जन्माला येते तिथून पुढे सहा महिन्याच्या आत पालकांनी नसबंदी करावी.

या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांच्या आसपास आहे आणि ते कुटुंब या योजनेस पात्र असेल तर नक्कीच या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

नवीन हाती घेतलेल्या धोरणानुसार आता प्रत्येक मुलीच्या वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांवरून वाढवून साडेसात रुपयांपर्यंत निश्चित केले आहे. यासोबतच या कुटुंबाचे प्रत्येक वर्षाचे उत्पन्न हे साडेसात लाखांपर्यंत आहे. ते सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून एकाच व्यक्तीच्या दोन मुली असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.

पात्र ठरवलेल्या कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून पैसे प्राप्त होणार आहेत. ज्यावेळी पहिली मुलगी सहा वर्षाचे होईल आणि दुसरी मुलगी बारा वर्षाची होईल त्यावेळी हे पैसे प्राप्त होतील आणि हे पैसे ज्या त्या मुलींच्या नावावर थेट प्रशासनाच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा केले जाते. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या नावाने किंवा तिच्या आईच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडण्यात येईल.

ही योजना राबवण्याचा महत्त्वाचा हेतू हाच आहे की, मुलीचा जन्म हा चांगल्या तऱ्हेने साजरा करण्यासाठी आणि तिचे कामकाज मार्गे लावण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मुलींच्या जन्माची नोंदणी करणे गरजेचे आहे.

या योजनेच्या माध्यमातून पहिल्या मुलीसाठी पाच हजार रुपये देण्यात येतील आणि दुसऱ्या मुलीसाठी अडीच हजार रुपयांची रक्कम प्राप्त होईल. या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

स्त्रोत : माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी येथे क्लिक करून अर्ज करा !

https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/schemes/manjhi-kanya-bhagyashree-scheme.php

Leave a Comment